शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

छावा संघटनेचे दिल्लीत जंतरमंतरवर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 6:21 PM

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी (दि. २६) आमरण उपोषण सुरू केले आहे.

सिन्नर : मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी (दि. २६) आमरण उपोषण सुरू केले आहे. आरक्षणाच्या मागणीचे निवेदन केंद्रीय न्याय आणि अधिकारिता मंत्री थवरचंद्र गेहलोत यांना देण्यात आले आहे.मराठा आरक्षण हे इतर मागास प्रवर्गात देण्यासाठी ४ आॅगस्ट २०१६ रोजी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण केले होते. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मंत्री गेहलोत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर इतर मागासवर्गाच्या सचिवांना यासंबंधी पत्र दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मागासवर्ग आयोगाकडे याबाबत बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांच्या वतीने करण्यात आली आहे.उपोषणात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, राजेंद्र ढाकेपाटील, अशोक खानापुरे, प्रदीप बिल्होरे, योगेश केवारे, परमेश्वर नलावडे, विजय काकडे, संपत पगार, निखिल पांगारकर, योगेश शिंदे, संपत पगार, रोहित दहिहंडे, भाऊसाहेब बैरागी, अंबादास काचोळे, सागर जगताप आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNew Delhiनवी दिल्लीagitationआंदोलन