पिंपळगाव लेप येथे जनशक्ती पॅनल विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:39 IST2021-01-21T20:19:11+5:302021-01-22T00:39:36+5:30
पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील ग्रा.पं. निवडणुकीत जनशक्ती जगदंबा माता पॅनलचे सात जागांवर वर्चस्व राहिले आहे. मात्र, या पॅनलचे नेतृत्व करणारे मधुकर साळवे यांच्या पत्नी पराभूत झाल्या.

पिंपळगाव लेप येथे जनशक्ती पॅनल विजयी
ठळक मुद्देपॅनलप्रमुखांच्या पत्नी पराभूत
या पॅनलचे सात जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग-१ मधून विनोद आहिरे विजयी झाले तर सुनिता माळी प्रभाग-२ मधून सखाहरी बिडवे तर रत्ना रसाळ तर गिता पोटे या विजयी झाल्या आहेत. प्रभाग-३ मधून कल्पना पोटे विजयी तर किरण गोधडे याप्रमाणे आदी उमेदवारांची निवड झाली आहे. याप्रसंगी केशव पोटे, मधुकर साळवे,बाळासाहेब दौंडे, संतु पोटे, विनोद आहिरे, किरण गोधडे, सखाराम बिडवे तसेच महिला उमेदवार कल्पना पोटे, सुनिता माळी, रत्नाबाई रसाळ, गीता पोटे आदी उपस्थित होते.