कोळगंगा नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:17 IST2018-03-27T00:17:46+5:302018-03-27T00:17:46+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाºया कोळगंगा नदीवरील टेकेश्वर बंधारा येथे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते व माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले.

कोळगंगा नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन
अंदरसूल : शहराला पाणीपुरवठा करणाºया कोळगंगा नदीवरील टेकेश्वर बंधारा येथे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते व माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. पालखेड धरणसमूहातून आवर्तन सुरू असून, यातून प्रासंगिक आरक्षणामधून चारी नं ४६ ते ५२ व अंदरसूलच्या कोळगंगा नदीवरील बंधारे थेट दुगलगावापर्यंत भरून देण्यात आले आहेत. यावेळी राजूसिंग परदेशी, आनंद शिंदे, प्रा. नानासाहेब लहरे, मकरंद सोनवणे, भगीनाथ थोरात, झुंजारराव देशमुख, विनिता सोनवणे, वैशाली जानराव, सुवर्णा बागुल, सोपान पवार, गोरख खैरनार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.