जळगाव नेऊर प्राथमिक शाळेत सन्मान लेकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 18:27 IST2020-01-05T18:26:47+5:302020-01-05T18:27:24+5:30

जळगाव नेऊर : जिल्हा परिषद शाळा जळगाव नेऊर शाळेत लेक शिकवा अभियानांतर्गत ‘सन्मान लेकींचा’ हा उपक्र म घेण्यात आला.

Jalgaon was honored at Neur Elementary School | जळगाव नेऊर प्राथमिक शाळेत सन्मान लेकीचा

जिल्हा परिषद शाळा जळगाव नेऊर येथे मुलींच्या घरावर पाटी लावताना मनिषा वाकचौरे, अनुराधा देशमुख, स्नेहा लिपारे, पालक, विद्यार्थी.

ठळक मुद्देयाप्रसंगी प्रत्येक मुलीचे औक्षण करण्यात आले.

जळगाव नेऊर : जिल्हा परिषद शाळा जळगाव नेऊर शाळेत लेक शिकवा अभियानांतर्गत ‘सन्मान लेकींचा’ हा उपक्र म घेण्यात आला.
शाळेतील प्रत्येक मुलीच्या घरावर मुलींच्या नावाच्या पाट्या या अभिनव उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. मुलींच्या नावाच्या पाट्या तयार करून त्यांच्या गृहभेटी व पालक भेटी घेऊन सदर पाट्या लावण्यात आल्या. याप्रसंगी प्रत्येक मुलीचे औक्षण करण्यात आले.
घरोघरी गुढी उभारण्यात आली. सुंदर रांगोळी काढली. या प्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य पालक उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका यांनीही या कार्यक्र मांमध्ये उस्फुर्त भाग घेतला. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मनीषा वाकचौरे, अनुराधा देशमुख, स्नेहा लिपारे यानी परिश्रम घेतले.

Web Title: Jalgaon was honored at Neur Elementary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.