Jalgaon Neur Receives Retired Jawans | जळगाव नेऊरला निवृत्त जवानाचा सत्कार
जळगाव नेऊरला निवृत्त जवानाचा सत्कार

जळगाव नेऊर : येथील भूमिपुत्र पांडुरंग सोनवणे सतरा वर्षांची सेवा करून भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त जळगाव नेऊर ग्रामपंचायत व पैठणी उत्पादक विक्र ेते, मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच हिराबाई शिंदे होत्या. बंडू शिंदे, अशोक दाते, माजी सभापती प्रकाश वाघ, सचिन कदम, तान्हाजी कुराडे, गणपत कांदळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी निवृत्त जवान सोनवणे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या सेवेतील अनुभव व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक जयाजी नाना शिंदे, माजी सरपंच कैलास कुराडे व हिराबाई शिंदे, चेअरमन राजेंद्र शिंदे, व्हाइस चेअरमन राधाकृष्ण कुराडे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, मुरलीधर सोनवणे, अंबादास सोनवणे, पांडुरंग शिंदे उपस्थित होते.


Web Title: Jalgaon Neur Receives Retired Jawans
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.