उसनवार पैशातून जेलरोडला एकास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:03 IST2018-07-16T01:02:45+5:302018-07-16T01:03:01+5:30

नाशिक : उसनवार पैशातून तिघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना जेलरोडवरील छत्रपतीनगरमध्ये घडली आहे़

Jail Road has been robbed of money | उसनवार पैशातून जेलरोडला एकास जबर मारहाण

उसनवार पैशातून जेलरोडला एकास जबर मारहाण

नाशिक : उसनवार पैशातून तिघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना जेलरोडवरील छत्रपतीनगरमध्ये घडली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर विसपुते (रा़ दसकगाव, जेलरोड) यांच्याकडून संशयित निकशा निकम याने पाचशे रुपये उसने घेतले होते़८ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उसनवार पैसे परत करण्याच्या कारणावरून कुरापत काढून संशयित निकशा निकम, समाधान निकम व सुभाष निकम यांनी शिवीगाळ
करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़
यामध्ये विसपुते यांच्या
पायास व छातीस दुखापत झाली असून, संशयितांनी या ठिकाणी कसा राहतो असे म्हणून
दमदाटी केली़ याप्रकरणी
उपनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Jail Road has been robbed of money

टॅग्स :Crimeगुन्हा