Jai Shriram of Hemant Godse Sai Charani, Sameer Bhujbal | हेमंत गोडसे साई चरणी, समीर भुजबळ यांचे जय श्रीराम

हेमंत गोडसे साई चरणी, समीर भुजबळ यांचे जय श्रीराम

ठळक मुद्दे गोडसे यांची शिर्डी येथे उपस्थितीभुजबळ यांनी काळाराम मंदिरात घेतले दर्शन

नाशिक- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख उमेदवारांनी भल्या सकाळी देवदर्शन घेऊन कौल मागितला. यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शिर्डी येथे जाऊन साई चरणी नतमस्तक झाले तर नाशिकमध्येसमीर भुजबळ हे काळाराम मंदिरात प्रभु रामचंद्रांना साकडे घालण्यासाठी गेले होते.

नाशिक लोकसभा निवडणूकीचा कौल यंदा बांधणे कठीण दिसत होते. त्यामुळे प्रमुख उमेदवार अपाणच विजयी होऊ असा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्वांनाच धाकधुक होती. अर्थात, हेमंत गोडसे हे निकालाच्या दिवशी देवदर्शनापासुनच सुरूवात करीत असतात. त्यानुसार रात्रीच ते शिर्डी येथे गेले होते. पहाटे चार वाजता साईबाबांच्या काकड आरतीला उपस्थित राहुन त्यांनी विजयासाठी प्रार्थना केली त्यानंतर ते नाशिकला आले. नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिर आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.

राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी देखील सकाळी नाशिक मध्ये प्रभु रामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ या देखील उपस्थित होत्या.
 

Web Title: Jai Shriram of Hemant Godse Sai Charani, Sameer Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.