जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमले नाशिक शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 19:04 IST2020-02-19T18:58:59+5:302020-02-19T19:04:41+5:30
नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने अवघी नाशिक नगरी दुमदुमली आहे. ढोल ताशांच्या गजरात नाशिक शहरातील मुख्य सार्वजनिक मिरवणूकीसह उपनगरांमध्येही मिरवणूकांना सर्वात जल्लोषात मिरवणूका सुरू आहेत.

जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमले नाशिक शहर
नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने अवघी नाशिक नगरी दुमदुमली आहे. ढोल ताशांच्या गजरात नाशिक शहरातील मुख्य सार्वजनिक मिरवणूकीसह उपनगरांमध्येही मिरवणूकांना सर्वात जल्लोषात मिरवणूका सुरू आहेत.
शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच शिवजयंतीचा जल्लोष सुरू आहे. विविध मंडळे आणि राजकिय पक्षांच्या वतीने भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. या सर्वच ठिकाणी दिवसभर शिवरायांना अभिवादनाचे कार्यक्रम सुरू होते. अनेक मुला- मुलींनी शिवरायांचे वेशभूषा देखील केली होती. भगवेध्वज आणि शिवरायांची चित्रे असलेल्या मोटारी शहर भर धावत होत्या आणि जल्लोषही करीत होत्या. शहरातील प्रत्येक शासकिय कार्यालये, शिक्षण संस्था तसेच राजकिय पक्षांच्या वतीने देखील अभिवादन करण्यात आले.
नाशिक जिल्हयात आणि शहरातील उपनगरांमध्ये शिवजयंती मिरवणूका काढण्यात आल्या आहेत. नाशिक शहरातील मुख्य मिरवणूकीचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्ताने सर्वच राजकिय पक्षांचे प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधींनी फेर धरल होता. ढोल ताशाच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत या मिरवणूका सुरू असून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, सातपुर येथिल सावरकर नगर येथे शिवरायांचे महानाट्य सायंकाळी सादर होणार असून याच परिसरात शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहेत.