इंदिरानगरात ‘जय भीम’चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:48 IST2019-04-16T00:47:48+5:302019-04-16T00:48:05+5:30
‘जय भीम’च्या जयघोषात परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राजीवनगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे पूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक श्याम बडोदे, बाळा पाठक, संतोष भांदुर्गे आदींच्या हस्ते करण्यात आले

इंदिरानगरात ‘जय भीम’चा जयघोष
इंदिरानगर : ‘जय भीम’च्या जयघोषात परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राजीवनगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे पूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक श्याम बडोदे, बाळा पाठक, संतोष भांदुर्गे आदींच्या हस्ते करण्यात आले. स्वागत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर देशमुख यांनी केले. यावेळी धीरज जोशी, सागर चव्हाण, दिगंबर नळे, आशिष पवार, लखन दोंदे आदी नागरिक उपस्थित होते. धम्म वंदना म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
समरसता मंचातर्फे अल्को मार्केटजवळील शहीद भगतसिंग वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी समरसता मंचाचे प्रांत संयोजक मकरंद ढवळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला. याप्रसंगी शहर समरसता मंचाचे डॉ. चंद्रशेखर पाठक, प्रमोद बोकारे, प्रभाकर कोठावदे, विठ्ठलराव कुलकर्णी, रवींद्र देशपांडे, भावसार, अनंतराव कुलकर्णी, प्रकाश जोशी आदी उपस्थित होते.