जय बाबाजी भक्त परिवार करणार सव्वाकोटी तास श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 23:02 IST2022-04-07T23:02:15+5:302022-04-07T23:02:59+5:30
पिंपळगाव बसवंत : गाव, शहर, मंदिर, रस्ते, स्मशानभूमी, गल्ली स्वच्छ करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून त्यासाठी १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास श्रमदान केले जाणार असल्याची माहिती परिवारामार्फत देण्यात आली.

जय बाबाजी भक्त परिवारातर्फे पिंपळगाव बसवंत येथे श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी सहभागी भाविक.
पिंपळगाव बसवंत : गाव, शहर, मंदिर, रस्ते, स्मशानभूमी, गल्ली स्वच्छ करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून त्यासाठी १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास श्रमदान केले जाणार असल्याची माहिती परिवारामार्फत देण्यात आली.
निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी समाज कल्याणासाठी १९६४ साली श्रमदान निष्काम सेवा ही परंपरा सुरू केली. त्या अनुषंगाने बाबाजींचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी या परंपरेत लाखो भक्तांना सहभागी करीत ह्यश्रमेव जयतेह्ण या तत्त्वानुसार श्रमप्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि कोविड संसर्ग टाळण्यासाठी सव्वाकोटी तास श्रमदान करण्याचे ठरवले आहे. यासाठी निफाड तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवाराने यात सहभागी होऊन तालुक्यातील शेकडो मंदिर परिसर स्वच्छ करीत या श्रमदान प्रक्रियेला सुरुवात केली.
प्रारंभी पिंपळगाव बसवंत येथील शिवाजी नगर परिसरातील मंदिरातून या श्रमदानाला सुरुवात झाली. या श्रमदानाचे उद्घाटन पिंपळगाव बसवंत शहराच्या सरपंच अलका बनकर व ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
इन्फो
श्रमदान सप्ताहाचे आयोजन
श्रमदान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान ३० तास श्रमदान नियोजित ठिकाणी करायचे आहे. श्रमदान करणाऱ्या व्यक्तीला श्रमदान कार्ड देण्यात येईल. श्रमदानाची तारीख, ठिकाण व वेळ नोंद केली जाईल. तसेच श्रमदानाची व्हिडिओ शूटिंग केली जाईल. दर महिन्यातून रविवार ते रविवार एक श्रमदान सप्ताह राहील. दरम्यान, शुभारंभप्रसंगी रामराव डेरे, दत्तू मेधने, संजय चव्हाण, सुरेश सरोदे, भागीरथ भोसले, इंद्रपाल चव्हाण, बाळासाहेब आंबेकर, नाना कुमावत, राजाराम भोसले, प्रशांत शिंदे, पुंडलिक कुयटे, छाया कुयटे, सुनीता मोरे, सुमन मोरे आदींसह शेकडो भाविक उपस्थित होते.