शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुंढे होते तेव्हा बरे होते... आता परिस्थिती बिघडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:46 IST

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायची. आता मुंढे यांची बदल्याने सर्वच परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला.

पंचवटी : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायची. आता मुंढे यांची बदल्याने सर्वच परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. प्रभाग बैठकीत विषय येत नसतील तर प्रभाग बैठका घेऊ नका, अशा शब्दात प्रशासनाला खडसावून कामे होत नसल्याचे खापर फोडले.  प्रभागाची बैठक सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२४) संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी तीन ते पाच लाखांच्या कामांचे विषय विषयपत्रिकेवर घ्यावे. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने सदस्यांच्या अधिकारावर गदा आलेली आहे. मनपाच्या सर्वच शाळांतील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. कुठे दरवाजे तुटले तर कुठे पाणी नाही, स्वच्छता नाही, बांधकाम, विद्युत तसेच संबंधित विभागाने तत्काळ पाहणी दौरा करून दखल घ्यावी तसेच मनपा शाळेत अ‍ॅक्वा गार्ड व पाण्याच्या टाक्या बसवाव्यात, अशी सूचना केली.विषयपत्रिकेवर विषय येत नसल्याने बैठक घेणे निरुपयोगी ठरत आहे. दिंडोरीरोडवरील तारवालानगरला गतिरोधक प्रश्न अजूनही प्रलंबित असून मनपाने त्याठिकाणी रंबलर आणि कॅट आय बसविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जगदीश पाटील यांनी केली. फुलेनगरला पथदीप बंद असल्याचे शांता हिरे यांनी सांगितले. तर आडगाव येथील मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. विषयपत्रिकेवर विषय येत नसतील तर प्रभाग सभा कशासाठी असा सवाल शीतल माळोदे यांनी केला. अमृतधाम येथे शौचालयाची स्वच्छता होत  नाही.हिरावाडीतील कालिकानगरला उभारलेल्या रुग्णालयात डॉक्टरही नाही आणि औषधही मिळत नसल्याची तक्रार पूनम मोगरे, रुची कुंभारकर यांनी केली तर प्रभागातील अनेक नागरिकांना घरटपट्टी तसेच पाणीपट्टीची देयके मिळत नसल्याचे प्रियंका माने यांनी सांगितले. मनपा तत्कालीन आयुक्त मुंढे यांची बदली झाली खरी, मात्र त्यानंतर प्रशासनावर वचक राहिलेला नाही शिवाय मुंढे होते त्यावेळी परिस्थिती ठीक होती, आता परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. बैठकीत झालेल्या चर्चेत पुंडलिक खोडे, हेमंत शेट्टी, सुरेश खेताडे, सरिता सोनवणे, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, संजय दराडे, राहुल खांदवे, आर. एस. पाटील आदींनी सहभाग घेतला होता.मनपा शाळांमध्ये सुरक्षारक्षक वाढवावेमहापालिकेच्या शाळांत सुरक्षारक्षक नसल्याने शाळांची दुरवस्था झालेली आहे. नाशिक महापालिकेच्या मुख्य कार्यालयात अनेक सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. महापालिकेला कोण खाते, तेथील सुरक्षारक्षकांची संख्या कमी करून तेच सुरक्षारक्षक मनपाच्या शाळेत नेमले तर शाळांची सुरक्षितता व देखभाल व्यवस्थित राहील.- अशोक मुर्तडक, माजी महापौर

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे