शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

वहिवाट बिकट वाट नसावी...!

By admin | Updated: July 23, 2014 00:26 IST

शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर चिखलपाण्याने स्वागत

नाशिक : ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको...’ हा अनंत फंदी यांचा फटका सर्वज्ञात आहे. परंतु वहिवाटच बिकट वाट झाली आणि त्या वाटेवर धोपट अर्थात सरळ मार्गाने जाणे मुश्कील होऊन बसले असेल, तर सामान्यांचे हाल विचारायलाच नको. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट तर लागलीच आहे, पण शासकीय-निमशासकीय कार्यालयांचा प्रवेशही चिखल-पाण्याने माखला आहे.
शहरात पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाण्याची डबकी साचली आहेत, तर काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांची दयनीय स्थिती झालेली असतानाच शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना कार्यालयात ये-जा करणे अवघड होऊन बसले आहे. शरणपूररोडवर पोलीस उपअधीक्षकांचा जाई बंगला आहे. या बंगल्यासमोर पावसाच्या पाण्याचे मोठे तळे साचले आहे. शरणपूररोडवरच मेळा स्थानकासमोर असलेल्या भूमिलेख कार्यालयातही चिखल झाला आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर पाणी साचल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो आहे.
त्र्यंबकरोडवरील जलसंपदा विभागाच्या प्रवेशद्वारावर पाण्याचे तळे साचल्याने उडी मारूनच आत प्रवेश करावा लागतो. तशीच स्थिती सिंचन सेवा भवनाची आहे. मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोरही चिखलाचे साम्राज्य आहे. वनअधिकारी (पश्चिम) यांच्या कार्यालयाकडे जाणारी वाट तर बिकट बनली आहे. हुतात्मा स्मारकाच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ग्रंथालय आहे. परंतु या ठिकाणीही पाणी व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण मंडळाकडे जाणारा मार्ग, तर पूर्णपणे चिखलाने माखला आहे. याठिकाणी जायचे, तर चिखलात फसण्याशिवाय पर्याय नाही. बिटको हायस्कूलशेजारी असलेल्या जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे प्रांगणातही चिखल-पाणी साचले आहे. त्यामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना रोजची परेड करणे मुश्कील बनले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, आरोग्य उपसंचालक कार्यालय, पोलीस आयुक्तालय, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव या ठिकाणीही कमी-अधिक प्रमाणात चिखल झालेला आहे. शासकीय कार्यालयांकडे जाणारी वाट बिकट बनल्याने रोज विविध कामांसाठी गाऱ्हाणे घेऊन जाणाऱ्या सामान्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. शासकीय कार्यालयांनी प्रवेशद्वारावर मुरूम-खडी टाकून मार्ग सरळ-सुकर बनवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)