े फेरपंचनाम्यांमुळे नुकसानीचा अंदाज कठीण

By Admin | Updated: May 8, 2014 21:31 IST2014-05-08T20:53:48+5:302014-05-08T21:31:56+5:30

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विशिष्ट भागातच हजेरी लावणार्‍या अवकाळी पावसामुळे होणार्‍या नुकसानीचा अंदाज बांधणेही यंत्रणेला कठीण झाले असून, एका ठिकाणचा पंचनामा पूर्ण होत नाही तोच दुसर्‍या दिवशी पुन्हा पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने त्याचा परिणाम भरपाई देण्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

It is difficult to predict damages due to reconciliation | े फेरपंचनाम्यांमुळे नुकसानीचा अंदाज कठीण

े फेरपंचनाम्यांमुळे नुकसानीचा अंदाज कठीण

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विशिष्ट भागातच हजेरी लावणार्‍या अवकाळी पावसामुळे होणार्‍या नुकसानीचा अंदाज बांधणेही यंत्रणेला कठीण झाले असून, एका ठिकाणचा पंचनामा पूर्ण होत नाही तोच दुसर्‍या दिवशी पुन्हा पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने त्याचा परिणाम भरपाई देण्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्‘ातील ग्रामीण भागात मार्च व एप्रिल महिन्यांत सातत्याने अवकाळी पावसाने हजेरी कायम ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले. महसूल व कृषी खात्याने नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविला व त्यावर शासनाने नुकसानभरपाईची रक्कमही पाठविली. परंतु त्यानंतरही पावसाचे थैमान कायम राहिले आहे. विशेष करून बागलाण तालुक्यातील विशिष्ट भागात तर दररोजच पाऊस हजेरी लावत असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश असल्याने यंत्रणेची पाठ फिरत नाही तोच पुन्हा पाऊस पडत आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे.
बुधवारी सायंकाळी जिल्‘ात सर्वदूर झालेल्या पावसामुळेही त्यात आता भर पडली आहे. सर्वाधिक पाऊस चांदवड तालुक्यात नोंदविला गेला असून, दोन ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे. चांदवडला १२, सिन्नर व इगतपुरी येथे प्रत्येकी ४, निफाडला २ व नाशिकला १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे.

Web Title: It is difficult to predict damages due to reconciliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.