नाशिकला सामना मिळणे ही गौरवाची बाब : विनोद शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:46 IST2018-12-13T00:46:28+5:302018-12-13T00:46:59+5:30
नाशिकला रणजी क्रिकेट सामना मिळणे ही खरोखरीच अभिमानाची बाब आहे. महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनने जबाबदारी सोपविल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

नाशिकला सामना मिळणे ही गौरवाची बाब : विनोद शहा
नाशिकला रणजी क्रिकेट सामना मिळणे ही खरोखरीच अभिमानाची बाब आहे. महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनने जबाबदारी सोपविल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
नाशिकसारख्या शहरामध्ये रणजी सामने होणे हे नाशिकच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. यापूर्वी नऊ सामने आयोजनाचा अनुभव असल्यामुळे महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनने जबाबदारी सोपविली आणि बीसीसीआयच्या प्रतिनिधींनीही आयोजनाबाबत समाधान व्यक्त केल्यामुळे नाशिकला सामना होत आहे. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि रणजीसारखे दर्जेदार सामने बघण्याची संधी नाशिकला मिळणार आहे. नाशिकच्या क्रिकेट रसिकांनी यापूर्वी सर्वच रणजी सामन्यांना प्रतिसाद दिलेला आहे. यंदाही तो मिळेल, यात शंका नाही.