विकासाचा मुद्दा दूर, आरोप-प्रत्यारोपांनीच गाजले मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:53 AM2019-10-19T01:53:15+5:302019-10-19T01:53:56+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला.

The issue of development is far, far away from the ground of allegations | विकासाचा मुद्दा दूर, आरोप-प्रत्यारोपांनीच गाजले मैदान

विकासाचा मुद्दा दूर, आरोप-प्रत्यारोपांनीच गाजले मैदान

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या राजकीय दिवाळीत कुणी फोडले सुतळी बॉम्ब, तर कुणी उडविल्या फुलबाज्या, नेत्यांच्या भाषणांची रंगत

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला.
जिल्ह्यात एकाच दिवशी तीन ते पाच ठिकाणी सभा घेत नेत्यांनी आपल्या भाषणात स्थानिक विकासाच्या मुद्द्यांऐवजी प्रतिस्पर्धी नेत्यांविरुद्ध आरोपांची आतषबाजी केली. काही नेत्यांनी व्यक्तिगत स्तरावर जात सुतळी बॉम्ब फोडले, तर काहींनी अगदीच फुलबाज्या उडविल्या.
शरद पवार यांचे तेल लावलेले पहिलवान एकमेकांच्या विरोधात लढले व त्यांना सोडून गेले. त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही. पवार यांची अवस्था शोलेतील जेलरसारखी झाली आहे. यंदा विरोधीपक्षच शिल्लक राहिलेला नाही. कॉँग्रेसच्या गेल्यावेळेइतक्या जागाही येणार नाहीत. पवार यांच्या पक्षाचे नाव राष्टÑवादी असूनही त्यांनी राष्टÑवादाच्या निर्णयाला विरोध दर्शविला. त्यांना स्वत:ला राष्टÑवादी म्हणवून घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.




पाच वर्षांत आपल्या सरकारने आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक कामे केली असून, हिंमत असेल तर आघाडीने आपल्या पंधरा वर्षांतील कामाचा हिशेब द्यावा, आपण पाच वर्षांच्या कामाचा हिशेब देऊ.
कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच
मग कलम ३७० सारख्या मुद्द्यांचा वापर केला जात आहे. पुलवामाच्या घटनेनंतरही हल्ला हा हवाई दलाने, सैन्याने केला. शौर्य सेनेने गाजविले, पण त्याचे श्रेय आपले पंतप्रधान घेतात. सत्ताधाऱ्यांनी कुठे श्रेय
घ्यायचे, त्याचे तरी भान राखायला
हवे. प्रत्येक प्रश्नांवर ते फक्त कलम ३७० म्हणतात. रात्री झोपेतपण ३७० अशीच बडबड करत असतील का?


अशी शंका येते.
सुडाचे राजकारण करणे ही महाराष्टÑाची संस्कृती नाही. तुमच्या पापांचा घडा आता भरल्याने त्याची फळे भोगा. बाळासाहेबांवर गुन्हा दाखल करणे ही राष्टÑवादीची चूक होती, असे अजित पवार आता सांगतात. मग त्याच्यामागे असलेल्या नेत्याचे नाव का सांगत नाही, राज्यात युतीचेच सरकार येणार आहे कारण काँग्रेस व राष्ट्रवादी संपली आहे. एकटे शरद पवार ८० व्या वर्षी झुंज देत आहेत, हे कौतुकास्पद आहे. हा जोश जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखविला असता तर ही वेळच आली नसती.



आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून गैरसमज पसरवित आहेत. आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागणार नाही.
या देशात धमकीचे व दहशतीचे राजकारण सुरू झाले असून यामध्ये बदल करायचा असेल तर सत्ता परिवर्तन अपरिहार्य आहे. राहुल गांधी पुन्हा प्रचारात उतरले, ते उतरले की मोदीही उतरले. पाच वर्षांत भाजपने काय केले याची चिरफाड चालू असताना राहुल गांधी यांनी आल्या आल्या राफेलची जुनी टेप वाजवायला सुरूवात केली आहे. राफेलवर काँग्रेसला भाजपची कोंडी करायची असेल तर त्यांनी मैदानात मनमोहन सिंगांना उतरविले पाहिजे. भाजपला सत्तेवर ठेवण्याचे काम काँग्रेसच करीत आहे.




सर्वच शेतकरी नेते हे प्रक्रि या उद्योगाचे मालक आहेत. त्यांच्या उद्योगाला कांदा व शेतमाल अल्पदरात उपलब्ध व्हावा यासाठी भाव पडले जात आहेत.
महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत आहे. एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? सत्तेसाठी शिवसेना भाजपच्या पाठीमागे घरंगळत चालली असून, ही माणसे आहेत की गोट्या? कोठेही घरंगळून न जाणारा विरोधी पक्ष मला हवा आहे.
मोदी सरकार आरसीईपी करारनामा करू पाहत आहे. त्यामुळे चीन, बांगलादेश, व्हिएतनाम येथून कापड आयात केले जाईल. सरकार हा करार करण्यात यशस्वी झाले तर देशाचे वस्त्रोद्योग क्षेत्र संपुष्टात येईल. कॉँग्रेस संपली असून, जगातील कुठलेही इंजेक्शन काँग्रेसला पूर्वावस्थेत आणू शकत नाही. मालेगाव शहरात स्वच्छतेअभावी क्षय रोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शहरातील विकासाकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष झाले
आहे.

Web Title: The issue of development is far, far away from the ground of allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.