Isma's body was found in a well at Maledumala | माळेदुमाला येथील विहीरीत आढळला इसमाचा मृतदेह

माळेदुमाला येथील विहीरीत आढळला इसमाचा मृतदेह

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

वणी : माळेदुमाला येथील विहीरीत एका इसमाचा मृतदेह आढळुन आला असुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. माळेदुमाला येथे शेतातील विहीरीवरील ईलेक्ट्रिक मोटार सुरु करण्यासाठी विलास घुगे (४६) हे गेले मात्र बराच वेळ झाला तरी ते परतले नाहीत. ते का? आले नाही हे पाहण्यासाठी ज्ञानेश्वर घुगे हे त्या ठिकाणी गेले तेव्हा विहीरीजवळ वरच्या बाजुला पकड व बॅटरी आढळुन आली. शंका आल्याने पोलीसांना याची माहीती देण्यात आली.
ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता विहीरीत विलास घुगे असल्याचे निदर्शनास आले. वणी ग्रामीण रु ग्णालयात त्यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यु झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Isma's body was found in a well at Maledumala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.