त्र्यंबकला अनोळखी इसमाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 19:00 IST2021-08-07T19:00:05+5:302021-08-07T19:00:32+5:30
त्र्यंबकेश्वर : लॉकडाऊनमुळे येथील बंद असलेल्या रिकाम्या, परंतु कुलूप नसलेल्या वर्ग खोलीत गुरुवारी (दि.५) सकाळी १०.३९ पूर्वी बेवारस प्रेत आढळून आल्याची खबर सागर भोई (रा.पाच आळी, त्र्यंबकेश्वर) याने पोलिसांना दिली.

त्र्यंबकला अनोळखी इसमाचा मृतदेह
त्र्यंबकेश्वर : लॉकडाऊनमुळे येथील बंद असलेल्या रिकाम्या, परंतु कुलूप नसलेल्या वर्ग खोलीत गुरुवारी (दि.५) सकाळी १०.३९ पूर्वी बेवारस प्रेत आढळून आल्याची खबर सागर भोई (रा.पाच आळी, त्र्यंबकेश्वर) याने पोलिसांना दिली.
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक यल्लप्पा खैरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. मयत साधारणपणे ४० ते ४५ वर्षाच्या दरम्यानचा आहे. दरम्यान, प्रेतउत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान भेट दिली.
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक खैरे मेघराज जाधव आदी करीत आहेत.