पत्नीसमवेत झालेल्या वादातून इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 01:54 IST2022-07-07T01:54:10+5:302022-07-07T01:54:50+5:30

पत्नीशी झालेल्या वादातून दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ५) सायंकाळी घडली

Isma commits suicide due to an argument with his wife | पत्नीसमवेत झालेल्या वादातून इसमाची आत्महत्या

पत्नीसमवेत झालेल्या वादातून इसमाची आत्महत्या

पंचवटी : पत्नीशी झालेल्या वादातून दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने

राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ५) सायंकाळी घडली. अण्णासाहेब कोंडाजी हळवर (४०) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

मंगळवारी अण्णासाहेब हळवर व त्यांच्या पत्नीमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला. त्या वादातून हळवर यांनी रागाच्या भरात काहीतरी विषारी औषध सेवन केले. त्यांना त्रास होऊ लागल्याने पत्नी सोनाली हळवर यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Isma commits suicide due to an argument with his wife