शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

इकबाल कासकर, छोटा शकीलच्या खटल्यात नाशिक चे सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 17:10 IST

या गुन्ह्यात कासकर पोलिसांच्या तावडीत असला तरी छोटा शकीलसह त्याचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. खटल्याकामी गृह खात्याने विधी व न्याय विभागाशी विचारविनियमय करून नाशिक जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अजय सुहास मिसर यांची शासनाने नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देकासकर दाऊदचा मुख्य हस्तकमिसर यांची शासनाकडून सरकारी वकील म्हणून नियुक्तीइकबाल कासकर कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम कासकरचा भाऊ

नाशिक : कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम कासकर याचा भाऊ इकबाल कासकर, छोटा शकील यांच्याविरूध्द ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७साली खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या खटल्याच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले आहे. या गुन्ह्यात कासकर पोलिसांच्या तावडीत असला तरी छोटा शकीलसह त्याचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. खटल्याकामी गृह खात्याने विधी व न्याय विभागाशी विचारविनियमय करून नाशिक जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अजय सुहास मिसर यांची शासनाने नियुक्ती केली आहे.इकबाल, इसरार सय्यद, मुमताज शेख उर्फ राजू, पंकज जगसी गंगर तसेच संघटीत गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या फरार संशयित आरोपी शकील शेख उर्फ छोटा शकील शमी अंसारी, गुड्डु व त्यांचे साथीदार यांनी वर्चस्व निर्माण करण्यासाठी दहशत पसरवून खंडणी वसूलीचा प्रयत्न केल्याबाबत ठाणे येथील गुन्हे शाखेने त्यांच्याविरूध्द कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अनेक तांत्रिक बाबी व संघटित गुन्हेगारी टोळींचे एकमेकांवरील वर्चस्व, व्हायरल कम्युनिकेशन, व्हाइपफोनचा वापर आदि तांत्रिक बाबी निष्पन्न झाल्या आहेत. या बाबी सिध्द करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी शासनाकडे विशेष सरकारी वकीलांची या खटल्यासाठी नेमणूक करण्याची विनंती केली होती. गृह विभागाने विधी व न्याय विभागासोबत चर्चा करून मिसर यांची शासनाकडून सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.----कासकर दाऊदचा मुख्य हस्तकखंडणी वसूलीच्या गुन्ह्यात दाऊदचा मुख्य हस्तक सराईत गुन्हेगार इकबाल कासकर यास गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांनी अटक केली आहे. त्याचा या गुन्ह्यातील सहभाग महत्त्वाचा आहे. म्होरक्या छोटा शकील अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसेच दाऊद इब्राहीम यास भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असून या पार्श्वभूमीवर या खटल्याकामी मिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या खटल्याच्या निकालाकडे अवघ्या महाराष्टÑासह पोलीस दलाचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :underworldगुन्हेगारी जगतMumbaiमुंबईNashikनाशिकCourtन्यायालय