शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बेपत्ता मुलीचा दोन तासांत तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:52 AM

परिसरातून हरविलेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांनी सतर्कता दाखवून निर्भया पथकाच्या मदतीने अवघ्या दोन तासांत ताटातूट झालेल्या मुलीची आणि आई-वडिलांची भेट घडविल्याने मांगीलाल चौधरी यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा ‘खुशी’ परतल्याने कुटुंबाचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.

सिडको : परिसरातून हरविलेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांनी सतर्कता दाखवून निर्भया पथकाच्या मदतीने अवघ्या दोन तासांत ताटातूट झालेल्या मुलीची आणि आई-वडिलांची भेट घडविल्याने मांगीलाल चौधरी यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा ‘खुशी’ परतल्याने कुटुंबाचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.त्रिमूर्ती चौकात शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास मांगिलाल चौधरी यांची दोन वर्षांची मुलगी खुशी परिसरात फिरताना पोलिसांना आढळून आली. मात्र तिला स्वत:चे अथवा आपल्या आई-वडिलांचे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ निर्भया पथकाच्या मदतीने आई-वडिलांचा शोध सुरू करून दोन तासांच्या आत खुशीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ताटतूट झालेल्या खुशीची तिच्या आई-वडिलांशी पुन्हात्रिमूर्ती चौकातील पोलीस चौकीजवळ दोन वर्षांची मुलगी एकटीच फिरताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला काहीही सांगता येत नव्हते. त्यामुळे मुलीचे नाव तसेच तिच्या आई-वडिलांचे नाव व त्यांचा राहण्याचा पत्ता शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिल्याने त्यांनी निर्भया पथक तीनला मदतीसाठी पाचारण केले.भेट झाल्याने चौधरी कुटुंबीयांचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव, पोलीस नाईक खैरनार, पोलीस शिपाई दीपक चव्हाण, विकास पाटील व त्रिमूर्ती चौकीतील हवालदार चव्हाण, पोलीस नाईक राऊत, सामाजिक कार्यकर्ते राकेश ढोमसे यांनी परिसरात दोन तास शोध मोहीम राबवून दोन वर्षांच्या खुशीचे वडील मांगीलाल चौधरी यांचा शोध लावला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुशी दोन तासांत परत मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक