बाधित ८९; कोरोनामुक्त ९२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 01:19 IST2021-10-11T01:18:32+5:302021-10-11T01:19:36+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि. १०) एकूण ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ८९ रुग्ण बाधित झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६४७ वर पोहोचली आहे.

Interrupted 89; Corona free 92 | बाधित ८९; कोरोनामुक्त ९२

बाधित ८९; कोरोनामुक्त ९२

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १०) एकूण ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ८९ रुग्ण बाधित झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६४७ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात प्रलंबित अहवालांची संख्या ३१९ झाली असून त्यात १५१ नाशिक मनपा क्षेत्रातील, १३३ नाशिक ग्रामीणचे तर ३५ मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थींची संख्या ७८३ वर पोहोचली आहे. त्यात ५०९ नाशिक ग्रामीण, २५१ नाशिक मनपा तर ३५ मालेगाव मनपाचे अहवाल आहेत.

Web Title: Interrupted 89; Corona free 92