थोरात विद्यालयात जागतिक महिला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:57 IST2021-03-08T20:56:56+5:302021-03-08T20:57:41+5:30

जानोरी : येथील कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

International Women's Day at Thorat Vidyalaya | थोरात विद्यालयात जागतिक महिला दिन

महिला दिनाच्या कार्यक्रमात बालताना मोनिका आथरे समवेत व्यासपीठावर प्रज्ञा पाटील, नंदकुमार डिंगोरे, प्राचार्य श्रीराम खुर्दळ, पर्यवेक्षक सुभाष पाटील आदी.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी कल्याणी बुनगे या होत्या.

जानोरी : येथील कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी कल्याणी बुनगे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून धावपटू मोनिका आथरे व योगशिक्षिका प्रज्ञा पाटील उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर नंदकुमार डिंगोरे, पर्यवेक्षक सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे संगीत शिक्षक दिलीप पागेरे व गीतमंचने स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्वरूपा थोरात यांनी करून दिला. प्रास्ताविक प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनी केले. दहावीच्या विद्यार्थिनी श्रावणी जाधव व सुप्रिया जाधव यांनीही वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिला विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सोनाली देशमुख व ललिता पाटील यांनी केले तर अनिता पवार यांनी आभार मानले.

 

Web Title: International Women's Day at Thorat Vidyalaya