आंतरराष्ट्रीय महिला दिन : अंबड-सातपूर पोलीस ठाण्यांचा उपक्रम पोलिसांतर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:57 IST2018-03-05T00:57:36+5:302018-03-05T00:57:36+5:30

सिडको : अंबड व सातपूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया रणरागिणींचा सत्कार करण्यात आला.

International Women's Day: Honored women by Ambad-Satpur Police Station activities | आंतरराष्ट्रीय महिला दिन : अंबड-सातपूर पोलीस ठाण्यांचा उपक्रम पोलिसांतर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार

आंतरराष्ट्रीय महिला दिन : अंबड-सातपूर पोलीस ठाण्यांचा उपक्रम पोलिसांतर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार

ठळक मुद्देरवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचे औचित्यसोशल मीडियाचा वापर करताना दक्षता घेण्याची माहिती

सिडको : अंबड व सातपूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया रणरागिणींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय प्रशासक प्रशिक्षण संस्थेच्या तहसीलदार अर्चना गोरे उपस्थित होत्या. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचे औचित्य साधत अंबड व सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीने भोळे मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ‘सायबर गुन्हे जनजागृती’ या विषयावर पोलीस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा यांनी सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता घेण्याची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. तर आॅनलाइन फ्रेंड या विषयावरदेखील त्यांनी खोलात जाऊन महिलांना मार्गदर्शन करत घेण्याच्या दक्षताही समजून सांगितल्या. शोभा पवार यांनी बाललैंगिक शोषण व पालकांची भूमिका या विषयावर उपस्थिताना माहिती दिली. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या विषयावर नमिता कोहक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, वाहतूक पोलीस शाखेचे नम्रता देसाई, सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, छाया देवरे, रुपाली खांडवी, सरिता जाधव, रेश्मा अवतरे, नैना अग्रवाल यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस उपनिक्षक छाया देवरे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी मानले.
यांचा झाला सत्कार
सुनीता देशमुख (कल्पतरू पापड गृहउद्योग), राधा कुटे (आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू), ज्योती देसले (स्कूल व्हॅनचालक), साधना पवार (बाललैंगिक अपराधातील पीडित मुलांसाठी कार्य), सुचिता सौंदाणकर (वसाहतीतील मुलांसाठी शैक्षणिक कार्य), सुनंदा सखदेव, डॉ. विद्या देशपांडे, सरोज कासारे, मानीत कोहक, रुपाली गायकर, नंदा चव्हाण, जिजाबाई भंदुरे, मंगला पाटील, छाया तिवडे, डॉ. योगिता बागुल, ताराबाई सोनार, उषा बागुल, ललिता भावसार.

Web Title: International Women's Day: Honored women by Ambad-Satpur Police Station activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस