आंतरजातीय विवाह लाभात नाशिक अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:17 IST2018-12-21T00:17:01+5:302018-12-21T00:17:20+5:30
आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेत नाशिक जिल्ह्यात दरवर्षी दीडशेपेक्षा अधिक प्रकरणे दाखल होत आहेत. डिसेंबरअखेर १५५ प्रकरणे दाखल असून, आर्थिक वर्षाखेर दोनशे जोडपी या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता जिल्हा परिषदेने वर्तविली आहे.

आंतरजातीय विवाह लाभात नाशिक अग्रेसर
नाशिक : आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहन योजनेत नाशिक जिल्ह्यात दरवर्षी दीडशेपेक्षा अधिक प्रकरणे दाखल होत आहेत. डिसेंबरअखेर १५५ प्रकरणे दाखल असून, आर्थिक वर्षाखेर दोनशे जोडपी या योजनेचा लाभ घेण्याची शक्यता जिल्हा परिषदेने वर्तविली आहे.
नव्या आदेशानुसार आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना ५० हजार रुपये अर्थसाह्य केले जाते. जातीयता संपुष्टात आणण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना आर्थिक लाभ दिला जातो.
नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता १५० पेक्षा अधिक जोडप्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सन २०१६ मध्ये १५२, २०१७ मध्ये १६५ तर २०१८ मध्ये १५५ जोडप्यांकडून लाभ घेण्यात आला आहे.