स्वाइनचा प्रादुर्भाव अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:12 IST2019-05-15T01:10:17+5:302019-05-15T01:12:16+5:30

शहरात स्वाइन फ्लूचा प्रभाव कायम असून, यंदा मे महिन्यात दहा दिवसांतच पाच रुग्ण आढळले आहेत.

The intensity of swine is still persisted | स्वाइनचा प्रादुर्भाव अजूनही कायम

स्वाइनचा प्रादुर्भाव अजूनही कायम

ठळक मुद्देयंदा पाच रुग्ण

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा प्रभाव कायम असून, यंदा मे महिन्यात दहा दिवसांतच पाच रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून आत्तापर्यंत दीडशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी स्वाइन फ्लूचा प्रभाव अत्यल्प होता. केवळ एका रुग्णालाच लागण झाली होती व त्याचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र जानेवारीपासून कहर कायम आहे. जानेवारी महिन्यात सात, फेब्रुवारी महिन्यात ४२, मार्च महिन्यात ४९ तर एप्रिल महिन्यात ३७ रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्यात आत्तापर्यंत पाच जणांना लागण झाली आहे.

Web Title: The intensity of swine is still persisted