पोषण आहाराबाबत दक्षता घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:09 IST2020-01-29T23:14:26+5:302020-01-30T00:09:47+5:30
नाशिक : जिल्ह्णातील आदिवासी व बिगर आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये कुपोषित बालकांची असलेली संख्या पाहता, अशा बालकांना आरोग्य व पोषण ...

पोषण आहाराबाबत दक्षता घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
नाशिक : जिल्ह्णातील आदिवासी व बिगर आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये कुपोषित बालकांची असलेली संख्या पाहता, अशा बालकांना आरोग्य व पोषण आहाराच्या सुविधा पुरविण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी हयगय न करता दक्षता घेण्याच्या सूचना महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात जिल्ह्णातील कुपोषित बालकांचा प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला. कुपोषित बालकांची संख्या पाहता, त्यांच्या वजनात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीने उपाययोजना करण्याबरोबरच बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी आपल्या प्रकल्पातील अंगणवाड्यांना भेटी देऊन बालकांना पोषण आहार व आरोग्य सुविधा मिळतात किंवा नाही याची पाहणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या. जे बाल विकास अधिकारी चांगले काम करून कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा असेल, मात्र काम चुकार करणाºयांची गय केली जाणार नसल्याचे आहेर यांनी सांगितले.
यावेळी रेखा पवार, गीतांजली पवार, शोभा बरके, गणेश अहिरे, कमल आहेर, महिला व बाल विकास अधिकारी दीपक चाटे, डॉ. दिनेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
कुपोषित बालकांसाठी आवश्यक त्या ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कविता धाकराव यांनी आशा वर्कर यांना गरोदर माता व स्तनदा मातांचे वजन करण्यासाठी वजनकाटे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली. कराटे प्रशिक्षण, व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणाबाबत सदस्यांना अवगत करण्याची सूचनाही देण्यात आली.