‘इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन’मुळे कोरोनाचा फैलाव टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:45 PM2020-04-18T21:45:32+5:302020-04-19T00:36:23+5:30

नाशिक : प्रारंभी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने कॉन्टक्ट ट्रेसिंग केल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यामधूनच काही रु ग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होत आहेत.

 'Institutional quarantine' prevented the spread of corona | ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन’मुळे कोरोनाचा फैलाव टळला

‘इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन’मुळे कोरोनाचा फैलाव टळला

Next

नाशिक : प्रारंभी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने कॉन्टक्ट ट्रेसिंग केल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यामधूनच काही रु ग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होत आहेत. त्यामुळे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात स्थानिक आरोग्य प्रशासनाला यश आल्याचा दावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केला आहे.
नाशिक जिल्ह्यात २८ मार्चपर्यंत एकही ‘कोरोना’बाधित रु ग्ण आढळून आला नव्हता, परंतु आजअखेर कोरोनाबाधित ७० रु ग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६२ रु ग्ण हे मालेगाव शहरातील असून, इतर ८ रु ग्णांपैकी ५ रु ग्ण हे नाशिक शहरातील असून, उर्वरित तीन रु ग्ण हे इतर तालुक्यातील आहेत. जवळपास १५ तालुक्यांपैकी ४ तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येतो, तर अन्य ११ तालुक्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आलेला नाही ही दिलासा देणारी बाब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
आता २० एप्रिलपासून दुसºया टप्प्याला सुरुवात करायची आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ८० टक्के भूभाग हा आजही कोरोनामुक्त आहे. त्यामुळे तेथील निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यासाठी शासनामार्फत मार्गदर्शक सूचनादेखील प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत. त्यामुळे आजतागायत संपूर्ण लॉकडाउन असलेला जो भूभाग कोरोना प्रभावित नाही, त्याठिकाणी काही प्रमाणात मोकळीक देण्यात येणार आहे. त्यासाठी काही नियम, अटी व विविध परवानग्यांची आवश्यकता असणार आहे.
या कालावधीतील नियम, अटी व परवानग्या कशा मिळतील याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांमार्फत यासाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुकर पद्धतीने परवानग्या मिळतील याचे नियोजन करण्यात येत आहे.

Web Title:  'Institutional quarantine' prevented the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक