मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:18 AM2019-03-22T01:18:44+5:302019-03-22T01:19:08+5:30

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणाºया अंबड येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Inspection by counting officers of counting centers | मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

अंबड येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आदी़

googlenewsNext
ठळक मुद्देकामकाजाचा आढावा : अधिकाऱ्यांना सूचना

सिडको : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणाºया अंबड येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामात होणार आहे. येत्या २३ मे रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मांढरे आणि पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी संयुक्तरीत्या मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला.
मतमोजणी केंद्र पाहणीच्या वेळी अपर जिल्हाधिकारी गीतांजली बाविस्कर, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरीक्षक सरिता नरके, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त पौर्णिमा चोघुले, अमोल तांबे, जिल्हा पुरवठा
अधिकारी श्रीनिवास अर्जुन, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल आदींसह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित
होते.
मतदान केंद्रातून येणाºया मतपेट्यांची वाहतूक, पार्किंग, मतमोजणी यंत्रे ठेवण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन तसेच विद्युत व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. या ठिकाणी करण्यात येणाºया अद्ययावत इंटरनेट व्यवस्था, साइडस्क्रीन, ध्वनिक्षेपक, गुदामाच्या आजूबाजूचा परिसर, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीची व्यवस्था याचाही उभयतांनी आढावा घेतला.

Web Title: Inspection by counting officers of counting centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.