प्रकल्पग्रस्त शेतकर्यावर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:32 IST2018-03-06T00:32:25+5:302018-03-06T00:32:25+5:30
अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी आपल्या शेतजमिनी देणाºया शेतकºयांवर अन्याय झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून धरणे, आंदोलन करूनही या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळाला नाही. यासंबंधी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रकल्पग्रस्त शेतकर्यावर अन्याय
नाशिक : अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी आपल्या शेतजमिनी देणाºया शेतकºयांवर अन्याय झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून धरणे, आंदोलन करूनही या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळाला नाही. यासंबंधी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अंबड, चुंचाळे, पाथर्डी, सातपूर गावाचे स्थानिक रहिवासी गेल्या ४० वर्षांपासून आपल्या वडिलोपार्जीत शेतजमिनीवर शेती करीत होते. परंतु या शेतजमिनी संपादित करण्यात येऊन त्यावर अंबड औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली. या शेतजमिनी अधिग्रहित करताना शेतकºयांना बाजारमूल्यापेक्षा अधिक मोबदला देऊ, कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेऊ अशी अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत या शेतकºयांना जमिनींचा योग्य मोबदला मिळाला नसून, मुलांना नोकरी मिळालेली नाही. भूखंड-देखील मिळालेला नाही. इ.स. १९७२ पासून सदर शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याविरुद्ध प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीने आवाज उठविला असून, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनावर साहेबराव दातीर, बाजीराव दातीर, गोकुळ दातीर, त्र्यंबक मोरे, शांताराम फडोळ, भरत अहेर, सुनील दातीर आदिंच्या स्वाक्षºया आहेत.