इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: May 6, 2014 22:02 IST2014-05-06T21:18:50+5:302014-05-06T22:02:18+5:30

वसंत मार्केट चौफु लीवरील अपघात : एक जण गंभीर

Injured biker killed in Innova | इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वसंत मार्केट चौफु लीवरील अपघात : एक जण गंभीर
नाशिक : व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयाकडून दुचाकीवर जाणार्‍या दोघांना सोमवारी रात्री भरधाव इनोव्हाने दिलेल्या धडकेत गंगापूर नाक्यावरील तरुण ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे़ या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना गंगापूर नाका परिसरात राहणारे जयेश वसंत थेटे (२१) आणि त्याचा मित्र सुमित निरंजन इंगळे हे दोघे सोमवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५, सीजी-७४७) व्ही़ एऩ नाईक महाविद्यालयाकडून मॅग्नम हॉस्पिटलकडे जात होते़ वसंत मार्केटजवळील चौफुली क्रॉस करीत असतानाच कॅनडा कॉर्नरकडून भरधाव आलेल्या इनोव्हा कारने (एमएच १५, सीटी-६५६७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़
कारची धडक इतकी जोरात होती की दुचाकी चालविणारा जयेश थेटे हा कारच्या दरवाजावर जोरात आदळला. त्यापाठोपाठ पाठीमागे बसलेला सुमित इंगळे हाही खाली पडला़ या दोघांनाही जवळच्याच मॅग्नम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉ़ प्रवीण गारे यांनी जयेशला मयत घोषित केले, तर सुमित इंगळेवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या अपघातात इनोव्हा चालकही जखमी झाला असून, त्याच्यावरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या अपघाताची सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Injured biker killed in Innova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.