अपघात रोखण्यासाठी पुढाकार आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:02 IST2020-01-18T23:35:38+5:302020-01-19T01:02:48+5:30
आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील सांगितले.

वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या उद््घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे, नाशिक फर्स्टचे संचालक सुरेश पटेल, अध्यक्ष अभय कुलकर्णी.
नाशिक : आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील सांगितले.
नाशिक फर्स्टच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. तसेच यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी हा उपक्रम देशासाठी प्रोजेक्ट मॉडेल ठरला असून, केंद्रीय मंत्रालयातदेखील याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले, तर नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे, नाशिक फर्स्टचे संचालक सुरेश पटेल, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे संताश कुमार, गणेश कोठावदे, सिमेन्सचे दीपक कुलकर्णी, विकास भामरे, प्रकाश अटकरे, राजेंद्र फड आदी उपस्थित होते.
सकारात्मकता हवी
अमेरिकेतील काही महिलांनी मद्यपान करुन वाहने चालविण्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे तेथील कायद्यात बदल करण्यात आले. मात्र आपल्याकडील लोक याकडे सकारात्मकतेने बघत नाही, अशी खंत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी व्यक्त केली.