नाशिक : जलसंपदा आणि महावितरण विभागाशी केलेल्या करारासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नाशिक महापालिकेने नागपूर महापालिकेला पत्र पाठवले असून, त्यांच्याकडे कराराची माहिती मागितली आहे.प्रलंबित करारासंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी मध्यंतरी गटनेत्यांची बैठक घेतली होती. यावेळी ज्याप्रमाणे महावितरणला प्रक्रियायुक्त पाणी पुरवल्यानंतर महपालिकेला कोट्यवधी रुपयांचे स्वामित्वधन मिळते तसे नाशिक महापालिकेला मिळत नसून महापालिकेच्या सांडपाण्यावर जलसंपदा विभाग मालामाल होत असल्याने आता नागपूर येथून माहिती मागविण्याचे ठरविण्यात आले होते, त्यानुसार आयुक्त कैलास जाधव यांनी हा पत्रव्यवहार सुरू केला होता.नागपूर महापालिकेला पत्र पाठवले असून, त्यांच्याकडे कराराची माहिती मागितली आहे.मनपाच्या वेगळ्याच मुद्द्याने आश्चर्यनाशिक महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात केवळ वार्षिक करार करावा आणि वादाच्या मुद्द्यांवर शासन स्तरावर निर्णय होईल, असे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या बैठकीत सांगितले होते. मात्र नाशिक महापालिकेने वेगळा मुद्दा उपस्थित केल्याने जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.करार लांबण्याची शक्यतानागपूर महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील कराराची माहिती मिळवण्याची कार्यवाही नाशिक मनपाने सुरू केली आहे. मात्र, माहिती मिळवण्या-साठी प्रक्रिया लाभल्यामुळे करारही लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जल करारासाठी नागपूर महापालिकेकडून मागवली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 01:30 IST
नाशिक : जलसंपदा आणि महावितरण विभागाशी केलेल्या करारासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नाशिक महापालिकेने नागपूर महापालिकेला पत्र पाठवले असून, त्यांच्याकडे कराराची ...
जल करारासाठी नागपूर महापालिकेकडून मागवली माहिती
ठळक मुद्देआयुक्तांचे पत्र : वीजनिर्मितीसाठी दिलेल्या पाण्याचे स्वामित्वधन मिळवण्यासाठी प्रयत्न