शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:35 IST

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.

ठळक मुद्देवटार : ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात; आर्थिक नियोजन कोलमडले

ओतूरला कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी करताना शेतकरी.वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात असून, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे.जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. हे पीक तीन ते चार महिन्यात येत असल्याने नगदी पीक म्हणून याकडे शेतकरी पाहतात. चालूवर्षी सुरुवातीपासून चांगला बाजारभाव असल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि बदलते हवामान पिच्छा सोडण्यास तयार नाही, परिणामी महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचविण्याच्या प्रयत्नात बळीराजा आहे.कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे भाजीपाला पिकेही यावर्षी कवडीमोल भावात विकली जात असल्याने परिसरातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला चांगले वातावरण असल्यामुळे पिके जोमात होती; पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे ऐन जोमात असलेल्या कांदा पिकावर मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेंडा वाळणे असेअनेक रोग येत असून, महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे.पाच-सहा वर्षांपासून वरु णराजा रुसला होता. परिणामी परिसरात पाण्याचे मोठे संकट होते; पण यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन गहू, हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, वातावारणाचा फटका गव्हालाही बसत असून, विविध रोगाने गव्हाला ग्रासले आहे तर हरभरा पिकाला ऐन गाठे भरण्याच्या वेळेस अळई लागल्याने हरभºयाच्या उत्पन्नात घट होणार आहे. यावर्षासाठी शेतीचा रब्बी हंगाम उभा करण्यासाठी पैसा उपलब्ध नसल्याने शेतकरी मोडकळीस आला होता; पण व्याजाने व उसनावर पैसे घेऊन रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली खरी; पण बदलत्या हवामानामुळे शेतकº्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पिके वाचविण्याचे बळीराजापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.महागड्या औषधांची फवारणीमहागडी औषधांची कांद्यावर फवारणी करीत आहे. या रोगराईमुळे यावर्षी कांद्याचं उत्पादन घटणार आहे. दरवर्षी ओतूर परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु या वर्षी सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीस व रोगराई अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा उशिराने कांदा लागवड होत आहे. त्यातच ओतूर धरणाच्या पाणी गळतीमुळे फेब्रुवारी महिन्यातच नदी कोरडी पडते. परिणामास विहिरींचे पाणी तळ गाठते चालूवर्षी चांगला पाऊसझाल्याने मार्च महिन्यापर्यंत थंडी राहील व पाणीही टिकेल, अशी आशा वाटते. मजूर टंचाईला यंदा सामोरे जावे लागले. बºयाच शेतकऱ्यांनी बाहेरगावांहून मजूर आणून लागवड ठेका पद्धतीने केली आहे. कांद्याला चांगले दर असल्याने महागडी रोपे आणूनही यंदा कांदा लागवडीत दरवर्षापेक्षा घट झाली आहे.ओतूर परिसरातील शेतकरी हैराण४ओतूर : परिसरात ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊन कांदा पिकावर करपा व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हैराण झाला आहे. यावर्षी दोन -तीन वेळा उन्हाळ कांद्याची रोपे टाकूनही अवकाळी पावसामुळे ती खराब होऊन वाया गेली. त्यामुळे थोडीफार जगवलेलीरोपे व इतर ठिकाणांहून विकत आणलेली महागडी रोपे घेत कशीबशी लागवड केली; परंतु गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सकाळी पडणारे धुके व दवबिंदू यामुळे करपा व भुरी रोगाने थैमान घातले आहे.माझा दोन एकर कांदा लागवड करून दोन महिने झाले आहेत; पण बदलत्या हवामानामुळे कांद्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भात होत आहे. महागडी फवारणी करूनही हवामान साथ देत नाही. बदलती शेती आणि पीक पद्धत जर बघितली तर शेती हासुद्धा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. भांडवल टाकून पिके निघतील का नाही याचा भरोसा नाही.- हरिष खैरनार, कांदा उत्पादक वटार

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा