शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाताच्या लागवडीवर महागाईचे सावट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 18:37 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर भात पिकाच्या लागवडीला सर्वत्र जोमाने सुरुवात झाली असून आवश्यक साधनांची, बियाणांची व खतांची खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान इंधन दरवाढीचा फटका अप्रत्यक्षपणे शेतक-यांना लागवडीसाठीही बसत असून वाढत्या महागाईबरोबर लागवडही आता महाग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देइगतपुरी तालुका :शेतकऱ्यांची लगबग, खते, बियाणे महागले

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर भात पिकाच्या लागवडीला सर्वत्र जोमाने सुरुवात झाली असून आवश्यक साधनांची, बियाणांची व खतांची खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान इंधन दरवाढीचा फटका अप्रत्यक्षपणे शेतक-यांना लागवडीसाठीही बसत असून वाढत्या महागाईबरोबर लागवडही आता महाग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.भात पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एक वेगळी ओळख आहे. धरणांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात पिकाबरोबर बागायती पिके घेण्याकडे लक्ष केंद्रित केले असले तरी पावसाळ्यात पारंपरिक भात पिके घेण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. पारंपरिक भाताच्या बियाणाला बगल देऊन नवनवीन व संकरित बियाण्यांची लागवड करून कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावरही अधिक भर आहे. देशात इंधनाच्या दारात भरमसाठ वाढ होत असल्याने या इंधन दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसत आहे.पशुधन घटल्याचा परिणामतालुक्यातील पशुधनात लक्षणीय घट झाल्याने शेतीच्या मशागतीसह पेरणीसाठी तालुक्यातील शेतकरी यंत्र व ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. डिझेलच्या दरातही वाढ झाल्याने पूर्वी ५०० ते ६०० रुपये प्रतीतासी भाड्याने मिळणारा ट्रॅक्टर आता कोरड्या मशागतीसाठी ७०० तर गाळासाठी ८०० ते ८५० रुपये प्रतिताशी मिळत आहे. याबरोबर पशुधन घटल्याने बैलाचे औत रोजावर मजुरीने मिळणे दुर्मिळ झाले असून दोन वर्षापूर्वी १५० रुपये रोजाने मिळणारे औत ५०० रुपये प्रतीदिवसाची मजुरी देऊनही मिळत नाही.संकरित बियाण्यांकडे वाढला कलदरम्यान गेल्या तीन ते चार वर्षापासून कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाजारात नवनवीन दाखल होणाऱ्या संकरीत बियाण्याच्या लागवडीला प्राधान्य दिल्याने, या संकरित बियाणाच्या उत्पन्नात भाताची भेसळ अधिक प्रमाणात येत असल्याने शेतक-यांना दरवर्षी सुधारित बियाणे खरेदी करावे लागत आहे. बियाणाच्या किमतीतही दरवर्षी भरमसाठ वाढ होत असते.इरलेही झाले महागभात पिकाच्या लागवडीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या पानघोंगडे (इरले) तसेच लोकरीपासून तयार होणारी घोंगडी यांच्याही किंमतीत यावर्षी भरमसाठ वाढ झाली आहे. बांबूच्या लाकडापासून तयार होणारा पान घोंगड्याचा साठा पुर्वी ६० ते ७० रुपयांना मिळत होता. हाच साठा आता १५० ते २०० रुपयांना मिळत आहे तर घोंगड्याच्या किमतीत यावर्षी दुप्पट वाढ झाली आहे.हाती काही नाही लागतमहागडी बियाणे, खते, औजारे, व साहित्य खरेदी करून महागाईला तोंड देऊन पेरणी केलेली शेतातून उत्पन्न घेण्यासाठी शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करावे लागते. भाताची पेरणी, लागवड, निंदणी, कापणी यासाठी भरमसाठ मजुरी द्यावी लागते. परिणामी यातून शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीच लागत नसल्याच्या अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येत असतो. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती