रोबोटिकची औद्योगिक क्रांती महेश झगडे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीन तंत्रप्रदर्शनाचे उद््घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:52 IST2018-01-01T00:51:41+5:302018-01-01T00:52:20+5:30
सातपूर : भविष्यातील औद्योगिक क्रांती ही रोबोटिक क्र ांती असणार आहे. या क्रांतीमुळे रोजगारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

रोबोटिकची औद्योगिक क्रांती महेश झगडे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीन तंत्रप्रदर्शनाचे उद््घाटन
सातपूर : भविष्यातील औद्योगिक क्रांती ही रोबोटिक क्र ांती असणार आहे. या क्रांतीमुळे रोजगारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयटीआयमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाºया प्रशिक्षणार्थींनी भविष्याचा वेध घेऊन करिअरला प्रारंभ करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने सातपूर येथील आयटीआयच्या मैदानावर घेण्यात आलेल्या विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. झगडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना औद्योगिक क्र ांतीचा इतिहास कथन केला. प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने बाहेर पडा, असाही सल्ला त्यांनी दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एचएएलचे उपव्यवस्थापक चाफळकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक सतीश सूर्यवंशी, सहायक संचालक श्वेता काळे, प्राचार्य सुभाष कदम, उपप्राचार्य सतीश भामरे आदी उपस्थित होते. या विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनात विभागातील ३५ आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी ३५ विविध कल्पक प्रकल्प सादर केलेले आहेत. प्रदर्शनाचे नियोजन प्रशांत बडगुजर यांनी केले आहे. स्वागत बाळासाहेब साताळे यांनी केले. यावेळी गटनिदेशक श्रीरत्न बरडे, महेश बागुल, अविनाश वाघ, सच्चिदानंद मोरे, काशीनाथ गायकवाड, राहुल विभांडिक, संजय काळे, सुनील पाटील आदींसह निदेशक उपस्थित होते.