नाशिक : मोटार चालविण्यासाठी ठेवलेल्या चालकानेच मालकाची कार लंपास केल्याचा प्रकार सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये घडल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन सुखराज साळवे (रा. दत्त चौक, सिडको) असे संशयीत चालकाचे नाव आहे. पुणे येथील चिचंवड भागात राहणारे उत्तम नामदेव बांगर यांनी त्याला चालक म्हणून नोकरीवर ठेवले. बांगर यांचे औद्योगीक वसाहतीत व्यवसायानिमित्त ये-जा असते. ३जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे बांगर नाशिकमध्ये आले होते. औद्योगीक वसाहतीतील एका हॉटेलमध्ये ते संध्याकाळी थांबले असता, हॉटेलच्या वाहनतळात उभी केलेली त्यांची इंडिको कार (एमएच १४ सीएक्स ७०३६) संशयीत साळवे याने पळवून नेली. कारसह संशयीत बेपत्ता झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी बांगर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार खरे करीत आहेत.
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये चालकानेच पळविली मालकाची कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:06 IST
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन सुखराज साळवे (रा. दत्त चौक, सिडको) असे संशयीत चालकाचे नाव आहे. पुणे येथील चिचंवड भागात राहणारे उत्तम नामदेव बांगर यांनी त्याला चालक म्हणून नोकरीवर ठेवले.
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये चालकानेच पळविली मालकाची कार
ठळक मुद्दे इंडिको कार (एमएच १४ सीएक्स ७०३६) संशयीत साळवे याने पळवून नेली. बांगर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला