इंदिरानगरला चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:17 IST2020-03-24T22:55:36+5:302020-03-25T00:17:24+5:30

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर वाहने आणण्यास मनाई असतानासुद्धा रस्त्यावर वाहने आणल्याने चार जणांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Indiranagar crime on all fours | इंदिरानगरला चौघांवर गुन्हा

इंदिरानगरला चौघांवर गुन्हा

इंदिरानगर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर वाहने आणण्यास मनाई असतानासुद्धा रस्त्यावर वाहने आणल्याने चार जणांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात संचारबंदी जारी करण्यात आली असले तरी नागरिक रस्त्यावर वाहने घेऊन फिरत आहे. त्यामुळे अखेर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. बोडे, दत्तात्रय पाळदे, संदीप लांडे, अकलाख शेख, जावेद खान, गस्त घालत असताना रस्त्यावर विनाकारण वाहनावर फिरणाऱ्या जियान शेख (रा. रेहनुमानगर), आकाश कदम (रा. पाटीलनगर सिडको), योगेश राऊत (रा. सिडको), शकील शहा (रा. वडाळागाव) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  Indiranagar crime on all fours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.