भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत

By धनंजय रिसोडकर | Published: August 10, 2019 10:45 PM2019-08-10T22:45:54+5:302019-08-10T22:49:47+5:30

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

India's youth need to be positive; The opinion of young Ambassador Abhijit Dighavkar | भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत

भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत

googlenewsNext
ठळक मुद्देयुवा पिढीला सक्षम करण्याची गरजयुवकांना सर्वच क्षेत्रात समान संधीची आवश्यकता

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या महत्व काय?
दिघावकर : १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) आमसभेत एक ठराव पारित होऊन १२ आॅगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळण्यात येण्याचे ठरले आणि त्यानंतर २००० सालापासून दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देऊन युवा पिढीला सक्षम करणे, शांत आणि समृद्ध समाज निर्माण करणे, त्या माध्यमातून सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हेच या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या आयोजनाचे ध्येय आहे.

प्रश्न : देशाला विकसित राष्टÑ करण्यासाठी भारतीय युवकांना कोणत्या प्रकारच्या संधी मिळायला हव्या असे तुम्हाला वाटते ?
दिघावकर : भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. युवकांची हीच प्रचंड संख्या भारतासारख्या विकसनशील देशाला विकिसत राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रांचा विकास हा तरु णाईचा कल्पकतेने, कुशलतेने आणि सकारात्मकपणे वापर करूनच आजपर्यंत झालेला आहे. परंतु भारताला या मनुष्यबळाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, तसेच आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

प्रश्न : तुम्ही युवकांसाठी कोणत्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करता ?
दिघावकर : आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र, अतिदुर्गम भागातील पाड्यांवर जाऊन शिक्षणाबाबत प्रबोधन, स्वच्छतेबाबत जनजागृती, पर्यावरण संवर्धनात त्यांचा सहभाग वाढवणे, मुलींची लग्न अठराव्या वर्षानंतरच करण्यामागील कारणांचा प्रसार, पुरुष-महिला समानता, जनसंख्या नियंत्रणात राखण्याबाबत प्रबोधन तसेच युवावर्गासाठी आणि गोरगरीब शेतकरी व महिलांसाठी उपयुक्त असलेल्या शासकीय योजनांची माहिती देणे,ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये जाऊन युवक-युवतींशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण अशा प्रकारे आमच्या जाणीव या संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जात असून त्याला युवा वर्गाकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो.

प्रश्न : भारतातील युवा पिढी विषयी काय मत आहे?
दिघावकर: वाढत्या युवा संख्येमुळे विविध समस्यांनाही भारताला तोंड द्यावे लागणार आहे. बेरोजगारी आणि त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीकडे कल वाढणे, सोशल मीडियाचा अतिवापर, युवकांमधील वाढतं नैराश्य आणि असंतोष, यांसारख्या विविध समस्यांना वेळीच पायबंद घालत युवापिढीला सकारात्मक बनण्याची गरज आहे.

मुलाखत: धनंजय रिसोडकर

Web Title: India's youth need to be positive; The opinion of young Ambassador Abhijit Dighavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.