मल्हार हिल कॅम्पसमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:40 IST2020-08-17T16:40:00+5:302020-08-17T16:40:51+5:30

औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणकि संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

Independence Day celebrations at Malhar Hill Campus | मल्हार हिल कॅम्पसमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

भाक्षी येथील मल्हार हिल शाळेत धजारोहण करताना भालचंद्र कोठावदे. समवेत मान्यवर.

ठळक मुद्देविद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमात आॅनलाईन सहभाग नोंदविला.

औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणकि संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रमुख पाहुणे के. पी. पगार शिक्षण, शाळा विकास अधिकारी सुरेश येवला, पं. स. सदस्य माणिक अहिरे, जगदिश कुलकर्णी, अतुल येवला, किरण सोनवणे, प्रताप सूर्यवंशी, जगदिश भामरे, रणधीर पवार, नंदिकशोर शेवाळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमात आॅनलाईन सहभाग नोंदविला. आॅनलाईन वक्तृत्व स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धेसारखे उपक्र म घेण्यात आले. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर सोळुंखे, अमोल गातवे, स्वाती दातरे, सारिका शिंदे,अर्चना पवार, जागृती नहिरे, विशाखा सोनवणे, हर्षाली मोरे, धनश्री ठोके, पवन नाडेकर, वैशाली मोरकर, सुजाता पाटील, सिंधु पवार, चेतना येवला, शिंदे मीनाक्षी, गणेश आहेर, निर्मला रौंदळ, रोहिणी सोनवणे, साहेबराव खैरनार, मनोहर गांगुर्डे, रोहिणी सूर्यवंशी, निर्मला रौंदळ आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Independence Day celebrations at Malhar Hill Campus