धामोडे येथे स्वातंत्र्यदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:05 IST2020-08-17T17:05:14+5:302020-08-17T17:05:48+5:30

सायगाव : येवला तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच विठ्ठल भड यांच्या हस्ते तर गुरु दत्त माध्यमिक विद्यालयात सोसायटी अध्यक्ष दिनकर येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Independence Day celebrations at Dhamode | धामोडे येथे स्वातंत्र्यदिन साजरा

धामोडे येथे स्वातंत्र्यदिन साजरा

ठळक मुद्देविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सायगाव : येवला तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच विठ्ठल भड यांच्या हस्ते तर गुरु दत्त माध्यमिक विद्यालयात सोसायटी अध्यक्ष दिनकर येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे संस्थापक रामदास गायकवाड होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक अर्जुन घोडेराव यांनी प्रास्ताविक तर शिवाजी भालेराव, एस. एन. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्र मास माजी सैनिक लहानु येवले, माजी सरपंच नानासाहेब भड, पोलीसपाटील देविदास भड, ज्ञानदेव गायकवाड, साईनाथ भड, नानासाहेब येवले, रामदास कोल्हे, पी. एस. दारूंटे, एस. टी. आहेर, टी. बी. गायकवाड, प्रविण येवले, माधव भड आदी उपस्थित होते.

Web Title: Independence Day celebrations at Dhamode