परमोरी ग्रामपंचायतीत १५ वर्षानंतर सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:44 IST2021-01-19T17:43:35+5:302021-01-19T17:44:13+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा दुरंगी झाली. त्यात जगंदबा पॅनलने ९ पैकी ९ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये १५ वर्षानंतर सत्तांतर घडले असून नवनियुक्त सदस्यांमध्ये युवतींचे प्रमाण अधिक आहे.

Independence after 15 years in Parmori Gram Panchayat | परमोरी ग्रामपंचायतीत १५ वर्षानंतर सत्तांतर

परमोरी ग्रामपंचायतीत १५ वर्षानंतर सत्तांतर

तीन प्रभागांमध्ये ९ जागांसाठी मतदान झाले. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने यामध्ये सर्व ९ जागांवर जगंदबा पॅनलने मुसंडी मारून उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत. यात युवती अधिक संख्येने निवडून आल्याने विकासकामांची गती वाढेल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
विजयी झालेल्या उमेदवारात दिलीप रामभाऊ केदार, श्रीपत मुरलीधर टोंगारे, पुजाताई अजय काळोगे, जयराम दत्तात्रय दिघे, रूपाली हेमंत दिघे , प्रतिभा महेश शिवले, नवनाथ बापुराव काळोगे , कमल शिवाजी गांगोडे व वंदना रमेश जाधव या उमेदवारांचा समावेश आहे. परमोरी येथे सुमारे पंधरा वर्षानंतर परिवर्तन झाल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

Web Title: Independence after 15 years in Parmori Gram Panchayat