वाढत्या थंडीमुळे आरोग्यावर होतोय प्रतिकूल परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:27 IST2020-12-17T20:08:50+5:302020-12-18T00:27:41+5:30
वणी : घसरलेले तपमान, ढगाळ वातावरण, दिवस-रात्र वाहणारे बोचरे वारे अशा स्थितीमुळे विविध आजारांनी रुग्ण त्रस्त झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. थंडीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

वाढत्या थंडीमुळे आरोग्यावर होतोय प्रतिकूल परिणाम
थंडी, सर्दी, अंगदुखी, कानदुखी, फ्लू अशा आजारांनी रुग्ण त्रस्त आहेत. तसेच रक्ताभिसरणची गती मंदावणे, लहान बालकांना न्युमोनिया होणे शा आजारांनीही काही घटक बाधित झाले आहेत. वातावरणात झालेल्या अचानक बदलाचा परिणाम असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. गरम पाण्याचे सेवन करणे, ताजे गरम व सकस अन्न खाणे तसेच शरीरात उष्णतामान समतोल राहण्यासाठी लवंग, आले, मध, हळद, खारीक, खोबरे, मेथी, डिंक यांचा वापर प्रामुख्याने केल्यास शरीराला असे तत्त्व या वातावरणात सकारात्मक व प्रभावी ठरतात अशी माहिती दीपक देशमुख यांनी दिली. विशेषतः वृद्ध व्यक्ती यांना थंडीचा त्रास अधिक जाणवतो. रक्ताभिसरण प्रक्रियेची गती कमी होते. त्यामुळे अशा व्यक्तीची काळजी घेण्याबरोबर लहान मुलांचीही काळजी घेण्याबाबत जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले. काही जणांना ॲलर्जी होते, त्याचा प्रतिकूल प्रभाव टाळण्यासाठी शक्यतो गरम ऊबदार कपडे वापरण्याबरोबर कानात गार हवा जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी माहिती विराम ठाकरे यांनी दिली. अशा नमूद आजारांनी बाधित रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असून, सदरची स्थिती आरोग्यास अपायकारक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.