शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

नाशिककरांमध्ये हेल्मेट वापराचा वाढला टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:53 AM

रस्त्यावर दुचाकी-चारचाकी अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण शहरात वाढले होते. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणी मोहीम सलग काही दिवस राबविण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले. यामुळे शहरात हेल्मेट वापराविषयी जनजागृती झाली तसेच कारवाईच्या धाकाने का होईना, नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा वापर होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देठिकठिकाणी नाकाबंदी; दंडात्मक कारवाईचाही बडगा

नाशिक : रस्त्यावर दुचाकी-चारचाकी अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण शहरात वाढले होते. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणी मोहीम सलग काही दिवस राबविण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले. यामुळे शहरात हेल्मेट वापराविषयी जनजागृती झाली तसेच कारवाईच्या धाकाने का होईना, नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा वापर होताना दिसून येत आहे.‘हेल्मेट है जरुरी, ना समझो इसे मजबुरी’ हे प्रबोधनपर वाक्य अनेकांच्या नजरेतून जाते. तसेच कानीदेखील पडते; मात्र त्यानुसार हेल्मेटचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा वापर करणारे फार कमी, म्हणूनच पोलीस प्रशासनाला पुन्हा कारवाईचा बडगा नाशिककरांवर उगारावा लागला. हेल्मेट सक्तीची अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेने आठवडाभर नाकाबंदी करून नागरिकांना हेल्मेटची सवय लावण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेदरम्यान आश्चर्यकारक अशा बाबीदेखील समोर आल्या.काही दुुचाकीस्वार महिला, पुरुष घरून निघताना हेल्मेट घेऊन निघाले जरी तरी त्यांचे हेल्मेट डोक्यावर नव्हे तर मोपेडच्या डिक्कीमध्ये असायचे. तसेच काही दुचाकीस्वार तर हेल्मेट डोक्यात अडकविण्यापेक्षा दुचाकीच्या ‘आरशा’ला संरक्षण देतानाही आढळून आले. काहींनी तर केवळ देखाव्यासाठी आणि पोलिसांच्या कारवाईपासून सुटका करून घेण्यासाठी दुचाकीला पाठीमागे हेल्मेट बांधून प्रवास करण्याचा फंडाही चालविल्याचे दिसले. एकूणच हेल्मेट असूनदेखील त्याचा वापरण्याचा केवळ कंटाळा नागरिकांकडून केला जात असल्याचेही समोर आले. पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर नागरिकांनाही हेल्मेट वापराचे महत्त्व पटू लागले असून, शहरात हेल्मेट वापराचा टक्का वाढला आहे.नांगरे पाटील यांनी हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिल्यानंतर काही प्रमाणात नागरिकांचा विरोध झाला; मात्र नाशिककरांनी हेल्मेट सक्ती स्वत:च्या सुरक्षिततेसाठी असल्याचे लक्षात घेत कारवाईचे स्वागत केले.सामाजिक संघटनाही सहभागीहेल्मेटसक्तीची तपासणी मोहीम सुरू होताच शहरातील विविध सामाजिक संघटनांनीदेखील या मोहिमेत सहभागी होऊन जनप्रबोधनाचा प्रयत्न केला. सुमारे पंधरा ते वीस स्वयंसेवी संघटनांचे स्वयंसेवक विविध नाक्यांवर पोलिसांसमवेत थांबून प्रबोधनपर घोषवाक्याचे फलक झळकविताना दिसून आले.४ जे लोक हेल्मेट वापरत नव्हते, त्यांनी नवीन हेल्मेट खरेदी करून वापरण्यास सुरुवात केली. शहरातील सिग्नलवर हेल्मेटधारक दुचाकीस्वारांची संख्या आता जास्त दिसू लागली असून हे शहराच्या दृष्टीने शुभ वर्तमान मानले जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयroad safetyरस्ते सुरक्षा