शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनाका भागात वाढली गुन्हेगारी ; टवाळखोरांचे पोलिसांना आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 17:25 IST

गेल्या तीन ते चार महिन्यात टाळेबंदीच्या प्रभावाने अनेक रोजगार संपुष्टात आले आहे.. त्यामुळे नाशिक शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत आहेत असतानाच टाळेबंदीचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून टवाळखोरांनी पोलिसांसमोर वाढती गुन्हेगारी रोखण्याचे  आव्हान उभे केले आहे.

ठळक मुद्देशहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ घरफोडी, दुकाने फोडण्याचे गुन्हे वाढले

नाशिक : कोरोनामुळे गेल्या तीन ते चार महिन्यात टाळेबंदीच्या प्रभावाने अनेक रोजगार संपुष्टात आले ओहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत आहेत असतानाच टाळेबंदीचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून  टवाळखोरांनी पोलिसांसमोर वाढती गुन्हेगारी रोखण्याचे  आव्हान उभे केले आहे.मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरांचे प्रमाण वाढले असून याचा परिमाण या भागातील गुन्हेगारी वाढण्याच्या स्वरुपात झाल्याचे दिसून येत आहे.  गोविंदनगर भागात गुरुवारी (दि.२३) सायंकाळी साडेपाच ते शुक्रवारी सकाळी साडसहा वाजेदरम्यान मार्क मॉल सुपरमार्के ट येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्के टचे बंद शटर वाकवून कॅश काउंटरमधून २ लाख ४८ हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली.  या प्रकरणी सुपर मार्केटचे मालक उंटवाडीतील जगतापनगर येथील  जितेंद्र मेतकर यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तर खोडेनगर परिसरातील निसर्ग कॉलनीत गजानन अपार्टमेंटमधील एका घराची बेल वाजविण्याच्या कारणावरून कुरापत काढून चाकूचा हल्ला केल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रवींद्र म्हात्रे यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी व त्यांची पत्नी यांना संशयित आरोपी विजय भिवसान कागणे याने धक्का बुक्की करून अर्वाच्च भाषत दमदाटीही केली. तसेच भिवसान याने म्हात्र यांच्या डाव्या बाजूस कमरेजवळ चाकूने मारून दुखापतही केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशाप्रकारे मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्य करणारांचे धाडस वाढले असून रात्रीच्या वेळेस शहरात संचार बंदी असतानाही घरफोडी करणारे आणि दुकाने फोडणारे पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोर