शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:08 IST

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरामध्ये गेल्या ४८ तासांमध्ये दिलासादायक पाऊस झाल्याने अप्पर वैतरणा धरणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : इगतपुरी तालुका परिसर हिरवाईने नटला

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरामध्ये गेल्या ४८ तासांमध्ये दिलासादायक पाऊस झाल्याने अप्पर वैतरणा धरणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.जुलै महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये वाढ होत नव्हती, मात्र गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने कमालीची वाढ होत आहे. गेल्या ४८ तासांत १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वैतरणा धरण ४७ टक्के भरले आहे. वैतरणा धरणाचा एकूण जलसाठा ११,७०० दशलक्ष घनफूट असून, सध्या धरणात ५५०० दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे. या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला असून, राहिलेल्या आवणीच्या कामाला वेग येणार आहे. इगतपुरी तालुक्यात भात पिकाची आवणी झाल्यानंतर जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने भातपीक वाया जाण्याची शक्यता होती; परंतु संततधार सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. वैतरणा परिसर पर्यटकांना पावसाळ्यामध्ये नेहमीच खुणावत असतो, मात्र जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने पर्यटकांनी या परिसराकडे पाठ फिरवली होती. परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत तर डोंगरावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. संपूर्ण परिसराने धुक्याची चादर पांघरली आहे.

टॅग्स :Rainपाऊस