पंचवटीसाठी आता वाढीव पाणीपुरवठा नवीन योजना : नीलगिरीबागेत जलशुद्धीकरण केंद्र

By Admin | Updated: May 9, 2014 23:29 IST2014-05-09T23:01:51+5:302014-05-09T23:29:29+5:30

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेने पाणीपुरवठ्याची स्थायी कामे हाती घेतली आहेत. त्या अंतर्गत पंचवटीत नीलगिरी बाग येथे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यासाठी बारा बंगला येथून जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात आला आहे.

Increase in water supply for Panchavati: New scheme: Water purification center at Nilgiribagh | पंचवटीसाठी आता वाढीव पाणीपुरवठा नवीन योजना : नीलगिरीबागेत जलशुद्धीकरण केंद्र

पंचवटीसाठी आता वाढीव पाणीपुरवठा नवीन योजना : नीलगिरीबागेत जलशुद्धीकरण केंद्र

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेने पाणीपुरवठ्याची स्थायी कामे हाती घेतली आहेत. त्या अंतर्गत पंचवटीत नीलगिरी बाग येथे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यासाठी बारा बंगला येथून जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात आला आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कुंभमेळ्यासाठी ९२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्याअंतर्गतच सध्या ५५ ते ६० कोटी रुपयांच्या कामांची कामे कार्यवाहीत आहेत. त्या अंतर्गतच हे काम करण्यात येणार आहे. बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथून ९०० मी. मी. व्यासाची जलवाहिनी पंचवटीत नेण्यात येणार आहे. सदरची जलवाहिनी विसे मळा, बीवायके चौफुली क्रॉसिंग करून दिवट्या बुधल्या मार्गावरून गंगापूररोडवरील जुने पंपिंग स्टेशन येथे नेण्यात येईल. तेथून रामवाडी मार्गे पंचवटीत नीलगिरी बाग येथे जलवाहिनी नेण्यात येईल. याठिकाणी ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या अंतर्गत होणार्‍या या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून तपोवन परिसराला त्याचप्रमाणे नांदूर-मानूर ते थेट आडगावपर्यंतच्या लोकवस्तीला पाणीपुरवठा होणार आहे. याशिवाय शहरात अन्य भागातही पाणीपुरवठ्याची कामे वेगाने करण्यात येत आहेत. वडाळा येथे बांधण्यात येत असलेला जलकुंभ दोन महिन्यांत पूर्ण होईल. बडदेनगर येथील जलकुंभांचे बांधकाम पूर्ण झाले असून, आठ ते दिवसांत तो वापरण्यास उपलब्ध होईल. नाशिकरोड येथील गोदावरीनगर येथेही जलकुंभाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

Web Title: Increase in water supply for Panchavati: New scheme: Water purification center at Nilgiribagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.