दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:00 IST2020-08-18T19:00:16+5:302020-08-18T19:00:40+5:30

दिडोरी : दिंडोरी तालुक्यात गेल्या ५ ते ६ दिवसापासून समाधान कारक पाऊस पडत असल्यामुळे धरणामधील पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे.

Increase in water supply from dams in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

ठळक मुद्देशेतकरीवर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दिडोरी : दिंडोरी तालुक्यात गेल्या ५ ते ६ दिवसापासून समाधान कारक पाऊस पडत असल्यामुळे धरणामधील पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत दिंडोरी तालुक्यात पाऊसाचे आगमन उशिरा झाले, त्यांमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल अशी स्थिती होती. मात्र सध्या तालुक्यातील धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरण ३७ टक्के तर वाघाड धरण ४०.११ टक्के तसेच पालखेड धरणात ७०.४२ टक्के, पुणेगाव २७.१६ टक्के, ओझरखेड ४४.०६ टक्के, तीसगाव १०.८९ टक्के धरणामध्ये पाणी येण्यास सुरु वात झाली आहे. त्यांमुळे शेतकरीवर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
पाऊस जरी उशिरा चालू झाला असला तरी पावसाची परिस्थिती अशीच काही दिवस राहिल्यास धरण पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ होऊ शकते असे आशादायक चित्र सध्या तरी तालुक्यात दिसून येत आहे. त्यात दिंडोरीच्या पश्चिम भागात चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मंगळवारी (दि.१८) सकाळ पासून दिंडोरी तालुक्यात पाऊसाने विश्रांती दिल्यामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा वेग मंदावला आहे. (फोटो १८ दिंडोरी)

Web Title: Increase in water supply from dams in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.