शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

शहरातील उकाड्यामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 1:19 AM

नाशिक : शहर व परिसराचे हवामान दोन दिवसांत अचानकपणे बदललेले अनुभवयास येत आहे. शहरात दिवसा उकाडा जाणवू लागला आहे.

नाशिक : शहर व परिसराचे हवामान दोन दिवसांत अचानकपणे बदललेले अनुभवयास येत आहे. शहरात दिवसा उकाडा जाणवू लागला आहे. शुक्रवारी (दि .४) शहराचे कमाल तापमान थेट ३३.१ अंश इतके नोंदविले गेले. वातावरणात दिवसभरात कमालीचा दमटपणा नाशिककरांना जाणवला.गुरुवारी रात्री १० वाजेनंतर शहरासह नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळागाव या भागात जोरदार सरींचा वर्षावही झाला होता, तर शुक्रवारी पहाटे शहराने धुक्याची चादर पांघरल्याचे चित्र पहावयास मिळाले. एकूणच लहरी निसर्गाने आपले रुप बदलल्याने वातावरण बदलाचा अनुभव नागरिकांना येत आहे. शुक्रवारी पहाटे शहर धुक्यात हरविले होते. यामुळे गोदावरीच्या विविध पुलांवरून नयनरम्य दृश्य नजरेस पडले. लक्ष्मीनारायण पुलावरुन तर तपोवनातील नदीपात्राचा परिसर जणू काश्मीरसारखा भासू लागला होता. यामुळे पहाटसमयी फेरफटका मारणाऱ्या नाशिककरांना निसर्गाचा हा नजारा कॅमेºयात टिपण्याचा मोह आवरता आला नाही. काहींनी सकाळची ही टिपलेली दृश्ये सोशल मीडियावरही पोस्ट केली आहेत.आठवडाभरापूर्वी शहराचे कमाल तापमान २५ तर किमान तापमान २१ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते. मागील चार दिवसांपासून अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याचे हवामान केंद्राच्या नोंदीवरून दिसते.मंगळवारी (दि.१) कमाल तापमानाचा पारा २८ अंशापर्यंत सरकला, मात्र गुरुवारी (दि.३) पारा थेट ३२.५ अंशांवर स्थिरावला. यामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नाशिककरांनी आपली घरे, कार्यालयातील पंख्यांचा वेग वाढवावा लागत आहे. शुक्र वारी तर उन्हाळ्याप्रमाणे कमाल तापमान ३३ अंशांच्या पुढे सरकले. दिवसभर नाशिककरांना उन्हाचा चटका व उकाडाही जाणवला.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक