कांदा दरात वाढ ; कमाल भाव २३६०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 18:25 IST2020-09-03T18:24:50+5:302020-09-03T18:25:10+5:30
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात गुरूवारी (दि.३) ४१५ ट्रॅक्टर्सद्वारे ११ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल २३६० रु पये, किमान ५०० रु पये तर सरासरी २००० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला. गेल्या

कांदा दरात वाढ ; कमाल भाव २३६०
ठळक मुद्देतीन दिवसात भावात ५०० रु पयाने वाढ झाली
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात गुरूवारी (दि.३) ४१५ ट्रॅक्टर्सद्वारे ११ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल २३६० रु पये, किमान ५०० रु पये तर सरासरी २००० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला. गेल्या
तीन दिवसात भावात ५०० रु पयाने वाढ झाली आहे.
कांदा भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठया प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत. असे असले तरी यंदा वातावरणामुळे चाळीत साठवलेल्या कांद्याचे सडण्याचे प्रमाण वाढल्याने निम्मा कांदा फेकून देण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आल्याने भाव वाढीने झालेल्या खर्चाचीच गोळाबेरीज होणार असल्याचे चित्र आहे.