पंचवटीत डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:31 IST2018-09-27T00:31:14+5:302018-09-27T00:31:31+5:30
परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटीतील रुग्णालयात संशयित डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, येथे डेंग्यूसदृश आजाराची साथ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंचवटीत डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ
पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटीतील रुग्णालयात संशयित डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, येथे डेंग्यूसदृश आजाराची साथ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पंचवटी परिसरातील घराघरात राहणाऱ्या मोठ्या व्यक्तीला व लहान मुलांना ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, हातपाय दुखणे यांसारख्या आजाराने ग्रासले असून, रुग्णालयात अशाप्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. पंचवटी परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे संशयित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढलेले असले तरी महापालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पंचवटीतील हिरावाडी परिसरात डेंग्यूसदृश आजार फैलावणाºया अळ्या झाडाच्या खोडात आढळून आल्याचे नगरसेवक पूनम मोगरे यांनी उघडकीस आणले होते. त्यानंतर प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या कारणावरून मोगरे यांनी स्वखर्चाने डेंग्यूसदृश आजाराच्या अळ्यांचा औषध फवारणी करत नायनाट केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून संशयित डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहे.